270 जोडय़ा जमविल्या, सर्वांचा सुखाचा संसार
जोडय़ा स्वर्गातच निश्चित होतात असे बोलले जाते, परंतु सध्या घटस्फोट आणि विभक्त होण्याच्या घटनेमुळे लोकांचा यावरील विश्वास डळमळीत झाला आहे. तरीही काही लोक मॅचमेकिंगच्या कलेत इतके परफेक्ट आहेत की लोक जर त्यांनी दोन लोकांना परस्परांसाठी सर्वोत्तम ठरविले तर त्यांचा शब्द अखेरचा मानला जात असतो.
मॅचमेकिंगमध्ये परफेक्ट अशाच लोकांच्या यादीत फर्नांडो क्यूवैस नावाचे एक स्पॅनिश प्रीस्ट देखील सामील आहेत. त्यांनी आतापर्यंत 270 जोडप्यांचा विवाह करविला असून यातील एकाचही घटस्फोट झालेला नाही. अशा स्थितीत त्यांना यशस्वी विवाहाची हमी मानले जात आहे. 14 वर्षांपासून त्यांच्या हातून झालेला एकही विवाह तुटलेला नाही.

स्पेनच्या वॅलेंसिया शहरात राहणारे फादर फर्नांडो यांनी 14 वर्षांपूर्वी दोन व्यक्तींची भेट घडवून आणली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत एक कॅथोलिक युवक होता, तो सुंदर युवतींच्या एक कॅथोलिक गटातून स्वतःसाठी वधू निवडू इच्छित होता. त्याने फादर फर्नांडोंसमोर स्वतःची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर 5 महिन्यांनी फादर फर्नांडो यांनी त्याचा विवाह एका युवतीशी लावून दिला होता. त्यानंतर त्यांनी कॅथोलिक युवक आणि युवतींचे मॅचमेकिंग सुरू केले. सध्या लोक स्वतःच्या धर्माला गांभीर्याने घेत नाहीत. अशा स्थितीत समान धार्मिक विचारसरणी असलेल्या दोन व्यक्तींना एकत्र आणण्यास मी मदत करतो. उमेदवारांचा पूर्ण बायोडाटा माझ्याकडे असतो आणि मग योग्य जोडीदाराशी त्याची भेट घडवून आणत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. उमेदवारांची प्रोफाइल वाचणे आणि योग्य जोडीदार शोधण्यात मी चांगला वेळ घेतो. परस्परांच्या छायाचित्राला उमेदवारांनी पसंती दर्शविली तर त्यांना परस्परांचा संपर्क क्रमांक देत स्वतःचे काम संपवितो. 14 वर्षांमध्ये 270 विवाह लावून दिले असून यातील एकाचाही घटस्फोट झालेला नाही. परंतु या जोडप्यांची भेट घडवून आणल्यावर त्यांच्या आनंदाची हमी घेत नाही. धर्म आणि अध्यात्मात श्रद्धा राखणारे दोन लोक आनंदी राहतात, कारण ते घेण्याऐवजी इतरांना देण्यावर विश्वास ठेवत असल्याचे फादर फर्नांडो यांनी सांगितले आहे.









