राज्यपाल रवि यांचे स्पष्टीकरण ः ऐतिहासिक संदर्भातून केले वक्तव्य
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूत राजभवनात चार जानेवारी रोजी आयोजित एका कार्यक्रमात राज्यपालांकडून तामिळनाडूला ‘तमिझगम’ संबोधित करण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. वाद वाढत चालल्याचे पाहून राज्यपालांनी एक पत्र प्रसारित करत स्पष्टीकरण दिले आहे. राजभवनात ‘काश-तमिळ संगममच्या स्वयंसेवकांना सन्मानित करण्यासाठी आयोजित एका कार्यक्रमात ऐतिहासिक सांस्कृतिक संबंधांवर विचार व्यक्त करताना मी ‘तमिझगम’चा उल्लेख केला. हा विषय इतिहासाशी निगडित होता आणि त्यावेळी कुठलेच तामिळनाडू नव्हते. याचमुळे ऐतिहासिक-सांस्कृतिक संदर्भात ‘तमिझगम’चा उल्लेख केला होता’ असा दावा राज्यपालांनी केला आहे.
यापूर्वी राज्यपालांनी विधानसभेतील स्वतःच्या अभिभाषणात राज्याचे नाव तामिळनाडूच्या ऐवजी ‘तमिझगम’ करण्याचा मुद्दा मांडलटा होता. त्यानंतर सत्तारुढ द्रमुक तसेच त्याचे सहकारी पक्ष काँग्रेस आणि विदुथलाई चिरुथिगाल काची यांनी जोरदार टीका केली होती. राज्यपालांना ‘गेट आउट’ असा मजकूर असलेली पोस्टर्स दाखविण्यात आली होती. तामिळनाडूवरून एक वेगळय़ा प्रकारची मानसिकता विकसित झाली आहे. जेव्हा एखादी गोष्ट पूर्ण देशात लागू होते, तेव्हा तामिळनाडू त्याकरता ‘नकार’ देते. राज्याला ही आता एक सवयच होऊन गेली आहे. ही मानसिकता बदलली गेली पाहिजे, सत्याचा विजय व्हायला हवा. तमिझगम हे नाव राज्यासाठी अधिक उपयुक्त असल्याचे राज्यपालांनी राजभवनात एका कार्यक्रमाला संबोधित करताना म्हटले होते









