खा विनायक राऊत यांचे गोवा रीजनल ऑफिसरना पत्र
कलंबिस्त पंचक्रोशीत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सुरू करण्यात आली होती . सदरची शाखा येत्या 25 जानेवारीपासून बंद करण्यात येत आहे . सदरच्या शाखेतील सर्व खाती सावंतवाडी शाखेशी जोडली जाणार आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून सुरू असलेली महाराष्ट्र बँकेची शाखा अचानक बंद करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे . त्यामुळे ज्येष्ठ नागरिक तसेच माजी सैनिक हे मोठ्या प्रमाणात या बँकेचे खातेदार आहेत . या खातेदारांचे तसेच ठेवीदारांची गैरसोय होणार आहे. सदरची बँक बंद करू नये अशा मागणीचे निवेदन सरपंच सपना सावंत व उपसरपंच सुरेश पास्ते माझी पंचायत समिती सदस्य रमेश सावंत शाखाप्रमुख दिनेश सावंत कुसाजी सावंत आधी नवनिर्वाचित सदस्य व ग्रामस्थांनी खासदार विनायक राऊत यांना दिले आहे . सदरची बँकेची शाखा या पंचक्रोशीतून बंद करू नये यासंदर्भात आपण निश्चितपणे लक्ष घालून बँकेच्या वरिष्ठांशी आपण चर्चा करणार असल्याचे आश्वासन श्री राऊत यांनी दिले. व तात्काळ बँकेची गोवा रिजनल ऑफिसर यांच्याशी चर्चा करून त्यांना सदरची बँक याची शाखा बंद करू नये असे पत्र देऊन स्पष्ट केले आहे. त्यामुळे सदरची शाखा कायम राहण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिली.
सावंतवाडी / प्रतिनिधी









