मुंबई
अभियांत्रिकी व बांधकामसह पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात अग्रेसर कंपनी लार्सन अँड टुब्रो यांचा समभाग शेअरबाजारात मंगळवारी 4 टक्के इतका वाढलेला पाहायला मिळाला. मंगळवारी शेअरबाजारात या कंपनीच्या समभागाच्या भावाने 4 टक्के वाढीसह 2214 रुपयांवर पोहचत नवी उच्चांकी झेप घेतली असल्याचे समजते. यापूर्वी 16 डिसेंबर 2022 ला कंपनीचा समभाग 2210 रुपयांवर पोहचला होता. कंपनीला नुकतेच हैदराबादमध्ये व्यावसायिक इमारतीच्या बांधकामाचे कंत्राट मिळाले आहे.









