पिळर्ण, म्हापसा व मुख्यालयातील 3 बंबनी विझविली आग
प्रतिनिधी /म्हापसा
म्हापसा-पर्वरी श्री वेताळ देवस्थानसमोरच असलेल्या मुळचंद्र भोगारनी यांच्या मालकीच्या भांड्याच्या दुकानाला रविवारी मध्यरात्री आग लागून आस्थापनासह सर्व भांडी, सोफा आदी सामान आगीत पूर्णत: जळून खाक झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. म्हापसा पिळर्ण व मुख्यालयातील बंबचा वापर करीत दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग विझविण्यात अग्निशमन दलास यश आले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पर्वरी वेताळ मंदिराच्या समोरच मुळचंद्र भोगारनी यांच्या मालकीचे कटलरी सामान आदी वस्तूंचे दुकान आहे. रोजच्या प्रमाणे रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान ते दुकान बंद करून घरी गेले असता 1.30 वाजण्याच्या दरम्यान आगीचे धूर येत असल्याचे याबाजूनी येणाऱ्यांनी पाहिले असता घटनेची माहिती त्वरित अग्निशमन दलास देण्यात आली. त्यावर पिळर्ण स्थानकाचे बंब त्वरित घटनास्थळी आले. दलाचे जवान आर.एन. नाईक, एस. जी च्यारी, पी.पी. म्हालदार, ऊद्रेश पांढरे, एस.एस. सावंत, व्ही.पी. पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीने मोठा पेट घेत रूद्र अवतार धारण केला होता. पहिल्या मजल्यावरून आगीचे लोळ बाहेर पडत होते. त्यांना आग विझविणे कठीण झाल्याने म्हापशाहून अग्निशमन दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव यांच्या नेतृत्वाखाली अशोक परब, विष्णू नाईक, विष्णू केसरकर, दत्तराज च्यारी, पी.व्ही. कांबळी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
आगीने अधिक पेट घेतल्याने मुख्यालयातूनही अन्य एक बंब मागविण्यात आले. सी.ए. तारी यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही.व्ही. खलप, ङि आर. देसाई, ङि रॉड्रीगीस यांनी घटनास्थळी धाव घेतली. आस्थापन बंद असल्याने कटरच्या सहाय्याने कुलूप तोडून शर्टर ओढून बाहेर काढत आगीतून सामान बाहेर काढण्यात आले. आतमध्ये दोन स्वयंपाक सिलिंडर होते. जवानांनी प्रसंगवधानाने ते लिसिंडर प्थम बाहेर काढले व सुटकेचा निश्वास सोडला. अखेर म्हापसा पिळर्ण व मुख्यालयातील बंबचा वापर करीत दोन तासाची झुंझ देत अखेर आग पहाटे 4 वा. आत्क्यात आणली. म्हापसा अग्निशमन दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव यांनी जवानांना मार्गदर्शन केले.









