नवी दिल्ली
6 जानेवारीला संपलेल्या आठवडय़ात विदेशी चलन साठय़ात जवळपास 1.268 अब्ज डॉलर्सची घसरण होत तो 561.583 अब्ज डॉलर्सवर राहिला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिली आहे. याआधीच्या दोन आठवडय़ात सलगपणे विदेशी चलन साठय़ात घट नोंदवली गेली आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये तर विदेशी चलन साठा अगदी 645 अब्ज डॉलर्स इतक्या विक्रमी स्तरावर पोहचला होता.









