प्रतिनिधी,कोल्हापूर
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महानगरी मुंबईच्या विकासात गेली 75 वर्षे बॉम्बे इंडस्ट्रिज असोसिएशनने हातभार लावला आहे. आपल्या देशाला महासत्ता बनविण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. तो पूर्ण करण्यामध्येही बॉम्बे इंडस्ट्रिज महत्वपूर्ण योगदान देईल, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि ‘मित्र’चे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन राजेश क्षीरसागर यांच्या करण्यात आले. मुंबईत हा सोहळा झाला.यावेळी क्षीरसागर बोलत होते.राज्याच्या ‘मित्र’ संस्थेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल या सोहळय़ात बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने क्षीरसागर विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी गेल्या वर्षभराच्या कारकिर्दीत स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष नेव्हिल संघवी यांच्या कामाची स्तुती करत नूतन अध्यक्ष आशिष गांधी यांना पुढील वाटचालीस क्षीरसागर यांनी शुभेच्छा दिल्या.
क्षीरसागर म्हणाले, संपूर्ण पश्चिम भारतातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्रातील सुमारे 1300 पेक्षा अधिक सभासद असणारी आणि अमृत महोत्सव वर्ष साजरा करणारी बॉम्बे इंडस्ट्रिज मोठी संघटना आहे. गेल्या अनेक वर्षा पासून रोजगार निर्मिती,आयात -निर्यात,अत्याधुनिक उत्पादने याद्वारे राज्यासह देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचे काम असोसिएशनने केले आहे.या असोसिएशन प्रमाणेच आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष साजरे होत आहे.भारताला सन 2047 पर्यंत विकसित भारत – इंडिया 47 च्या संकल्पनेतून जागतिक महासत्ता बनविण्याचा संकल्प देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. वास्तविक पाहता जेव्हा देशाची अर्थव्यवस्था 2 ट्रिलियन वरून 5 ट्रिलियनवर जाते तेव्हा कोणत्याही राष्ट्रातील सर्वोच्च बुल मार्केट होते.
आजतागायत फक्त 3 देशच अशी कामगिरी करू शकले आहेत.जागतिक महासत्ता बनण्याच्या प्रवासाकडे भारत आणि भारतीय अर्थव्यवस्थेची नुकतीच सुरुवात होत आहे.विकसित भारताची ही उद्दिष्टे साध्य करीत असताना राज्यांना सुद्धा सन 2047 पर्यंत संपूर्णपणे विकसित होणे गरजेचे आहे.या दृष्टीने महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन 2027 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर व सन 2047 पर्यंत 3.5 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचविणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे.देशाच्या सकल उत्पन्नामध्ये (GDP) महाराष्ट्राचा वाटा 15% आहे.नीति आयोगाच्या धर्तीवर राज्यामध्येही अशा संस्थेची स्थापना करण्याबाबतच्या सूचना नीति आयोगाकडून देण्यात आल्या.त्यानुसार नीती आयोगाच्या धोरणाशी सुसंगत मात्र राज्याच्या गरजांची दखल घेत खासगी क्षेत्र व अशासकीय संस्थाच्या सहभागाद्वारे राज्याचा जलद व सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिटय़ूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेची स्थापना करण्यात आली असून, या संस्थेच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहअध्यक्षपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपाध्यक्षपदावर मी आहे.
राज्याच्या विकासाला धोरणात्मक,तांत्रिक आणि कार्यात्मक दिशा देण्याची जबाबदारी या संस्थेच्या माध्यमातून आमची आहे.आगामी काळात भारत देशाला जागतिक महासत्ता बनविण्यासाठी राज्याचा जी.डी.पी वाढविण्याच्या दृष्टीने मित्र संस्थेच्या माध्यमातून विविध संकल्पना राबवून जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न सत्यात उतरवू.यामध्ये बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल,असा विश्वासही क्षीरसागर यांनी व्यक्त केला.यावेळी बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष नेव्हिल संघवी,नूतन अध्यक्ष आशिष गांधी,सेंट्रम ग्रुपचे चेअरमन जसपाल बिंद्रा,कोकुयो कॅमलिन लिमिटेडचे व्हॉइस चेअरमन श्रीराम दांडेकर, बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कोठारी,सचिन शहा,अमित कुमार आदी संचालक मंडळ,सभासद उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









