पुणे / प्रतिनिधी :
वायव्य भारतात थंडीची लाट असून, महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. नवीन वर्षात पदार्पण करीत असताना महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेशसह उत्तर भारतासह देशाच्या अनेक भागात सध्या मोठ्या प्रमाणात थंडी वाढली आहे. उत्तरेसह राजस्थान, पंजाब, हरियाणा अर्थात वायव्य भारतात थंडीची लाट आहे.
महाराष्ट्रात चढ-उतार कायम असून मागच्या तीन ते चार दिवसांच्या तुलनेत थंडीचा कडाका काही अंशी कमी झाला आहे. मात्र, पुढचे काही दिवस थंडीचा हा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे. रविवारी सर्वांत कमी तापमान 7.8 जळगाव येथे नोंदविण्यात आले.
राज्याच्या काही भागांत नोंदविण्यात आलेले किमान प्रमाण पुढीलप्रमाणे :
पुणे 10.7, जळगाव 7.8, कोल्हापूर 16, महाबळेश्वर 13.7, नाशिक 8.4, सांगली 14.9, सातारा 12.7, सोलापूर 15.6, मुंबई 16.2, रत्नागिरी 15.8, डहाणू 13, उस्मानाबाद 11.1, औरंगाबाद 8.8, परभणी 13.5, नांदेड 14.6, अकोला 13.2, अमरावती 13, बुलढाणा 12.4, ब्रम्हपुरी 15, चंद्रपूर 15.8, गोंदिया 12.8, नागपूर 14.3, वाशिम 12.8, वर्धा 13.6, यवतमाळ 12.5, तर पणजी 18.4








