व्हाइट हाउसपासून दीड तासाच्या अंतरावर स्वतःचे घर
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्या वैयक्तिक घरातून टॉप सिक्रेट डॉक्युमेट्स हस्तगत करण्यात आले आहेत. हे दस्तऐवज 2009-17 दरम्यानचे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या कालावधीत बिडेन हे ओबामा प्रशासनात उपाध्यक्ष होते. बेकायदेशीरपणे हे दस्तऐवज स्वतःच्या घरात ठेवल्याचा आरोप बिडेन यांच्यावर होत आहे. तर याप्रकरणाच्या तपासात सहकार्य करत असल्याचे बिडेन यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.
बिडेन यांचे हे घर डेलावेयर प्रांतातील विलमिंगटन शहरात आहे. वॉशिंग्टनपासून तेथे सुमारे दीड तासात पोहोचता येते. बिडेन यांनी 20 जानेवारी 2021 मध्ये अध्यक्षपद स्वीकारल्यावर 722 दिवसांपैकी 194 दिवस स्वतःच्या मालकीच्या घरांमध्ये घालविले आहेत. यात विलमिंगटन येथील ‘ड्रीम होम’ आणि रेहॉबोथ बीच शहरातील 21 कोटी रुपयांचे घर सामील आहे.

गोपनीय दस्तऐवज घराच्या गॅरेजमधून हस्तगत झाले. बिडेन या गॅरेजमध्ये स्वतःच्या वडिलांकडून मिळालेली कार 1967 शेवरले कॉर्वेट ठेवतात. काही दस्तऐवज एका खोलीतून हस्तगत झाले, या खोलीला बिडेन स्वतःची पर्सनल लायब्रेरी संबोधित आहेत. यापूर्वी बिडेन यांच्या वॉशिंग्टन येथील जुन्या कार्यालयात गोपनीय दस्तऐवज प्राप्त झाली होती.
बिडेन यांच्या घरातून हस्तगत करण्यात आलेल्या गोपनीय फाइल्सच्या चौकशीसाठी अमेरिकेच्या न्याय विभागाने एक विशेष कौन्सिल नियुक्त पेल आहे. या फाइल्समध्ये काय आहे याची कल्पना नसल्याचा दावा बिडेन यांनी केला आहे. तर युक्रेन, इराण, ब्रिटनशी निगडित गोपनीय माहिती आणि 2015 मध्ये पुत्र बीयू बिडेन याच्या झालेल्या मृत्यूसंबंधी यात तपशील असल्याचे बोलले जात आहे. अमेरिकेच्या कायद्यांमध्ये गोपनीय दस्तऐवज अवैधपणे बाळगणे गंभीर गुन्हा आहे.









