आलिशान बंगल्यासारख्या सुविधांचा समावेश
घर खरेदी करणे कुणाचेही स्वप्न असते, यासाठी लोक स्वतःयच आयुष्यभराची कमाई खर्च करत असतात. अनेकदा यात त्यांना यश मिळते आणि अनेकदा अपयशही पदरी पडते. याचदरम्यान एक असा व्हिडिओ समोर आला आहे, जो घर खरेदी करणाऱयांसाठी स्वप्नवत ठरू शकतो. या घराला पोर्टेबल होम म्हटले जात आहे.
500 चौरस फुटांचा आकार
या व्हिडिओला सोशल मीडियावर अनेक युजर्सनी शेअर केले आहे. अलिकडेच आनंद महिंद्रा यांनीही याला शेअर करत सुमारे 40 लाख रुपयांमध्ये 500 चौरस फुटांचे फोल्डेबल घर उपलब्ध होत असल्याचे म्हटले आहे. अशाप्रकारचे घर भारतातही सादर केले जाऊ शकते आणि 40 लाख रुपयांहून अधिक कमी किमतीत हे घर लोकांना मिळू शकते. आपत्तीनंतर पीडितांसाठी अशाप्रकारची घरे अत्यंत योग्य ठरणार असल्याचे महिंद्रा यांनी म्हटले आहे.

आलिशान बंगलाच जणू
एका ट्रकासारख्या वाहनावर या पोर्टेबल घराला घेऊन काही लोक येत असल्याचे आणि एका ठिकाणी उभे करत असल्याचे या व्हिडिओत दिसून येते. यानंतर जिना आणि अन्य गोष्टींचा वापर करत या घराला आकार होते. काही लोक या घराच्या भिंतीचा आकार वाढवत होते, तर काही लोक घराच्या आतील भागाचा आकार देखील वाढवत होते. काही क्षणात हे घर आलिशान बंगल्यात रुपांतरित झाल्याचे व्हिडिओत दिसून येते.
भारतात उपयुक्त ठरणार
या घराच्या आत अनेक सुविधा दिसून येत असून त्या एखाद्या आलिशान घरातच असू शकतात. एवढेच नाही तर घरात सुखसुविधायुक्त सर्व गोष्टी उपलब्ध दिसून येतात. बेडरुमपासून किचनपर्यंत सर्वकाही नवे होते. याचा व्हिडिओ समोर येताच याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता दिसून आली आहे. भारतासाठी अशाप्रकारचे घर अत्यंत उपयुक्त ठरू शकते असे काही लोकांनी म्हटले आहे.









