प्रयाग चिखली वार्ताहर
करवीर तालुक्यातील श्री क्षेत्र प्रयाग येथे आज रविवारी (दि.१५) सूर्य मकर राशित प्रवेश करते समयी संगमावरील स्नान व बाणसंगमेश्वर-दत्त दर्शनाच्या महापुण्यपर्वकाळास प्रारंभ झाला. या महायोगावर कोल्हापूर परिसरातील शेकडो भाविकांनी पहाटेपासून स्नान व दत्त दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी सात वाजता महापुण्यपूर्व काळा निमित्त येथील दत्तात्रयांची पालखी गंगेवर स्नानासाठी गेली यावेळी दत्तात्रयांना स्नान घालण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. यावेळी परिसरात दत्तात्रयांची पालखी येथील सर्व देवतांना भेटी देऊन मंदिरात आल्यानंतर यशवंत गिरीगोसावी यांनी दत्तात्रय पूर्णाकृती मूर्तीची पूजा बांधली त्यानंतर महाआरती झाली दिवसभरात हजारो भाविकांनी स्नान व दर्शनाचा लाभ घेतला.
आज स्नान व दर्शनासाठी चा सुरू झालेला महापुण्यपर्वकाळ पुढे महिनाभर राहणार असून या ठिकाणी यापुढे महिनाभर यात्रा भरणार आहे दरम्यान दररोज येथील दत्त मंदिरामध्ये आरती भजन प्रवचन नाम जप सोहळा महाप्रसाद अशा आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रमाचे महिनाभर आयोजन होणार आहे. या महापुण्यपर्व काळाच्या निमित्ताने या ठिकाणी सालाबाद प्रमाणे चालू वर्षीही मोठी यात्रा भरली आहे महिनाभरातील विविध धार्मिक कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे येथील पुजारी यशवंत गिरी- गोसावी यांनी आवाहन केले आहे.
कोल्हापूर पासून पाच किलोमीटर वर पश्चिमेस असलेल्या क्षेत्र प्रयाग येथे सूर्य मकर राशित प्रवेश करताना स्नानाचा महापुण्यपर्व काळास प्रारंभ होतो या महापुण्यपूर्व काळामध्ये या ठिकाणी पंचगंगेचे मूळ संगम ठिकाणी स्नान आणि दर्शन केल्याने पुण्य मिळते अशी भाविकांची धारणा आहे या काळात या ठिकाणी विविध प्रकारचे धार्मिक यज्ञविधी यांचे आयोजन केले जाते.गुरुचरित्र पारायण ज्ञानेश्वरी पारायण भजन प्रवचन कीर्तन नाम जप, आरती पालखी काढणे असे विविध धार्मिक अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. दर गुरुवारी पालखी काढण्यात येते यावेळी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
मकर संक्रांतीच्या निमित्ताने सुरू झालेला हा स्नान पुणे पर्वकाळ एक महिनाभर असून पर्यटकांना व भाविकांना एक पर्वणीच उपलब्ध झाली आहे. दरम्यान, पुढील महिनाभरात या ठिकाणी दररोज हजारो भाविक स्नान व दर्शनासाठी येणार असून भाविकांच्या व पर्यटकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाने सुविधा पुरवाव्यात अशी मागणी भाविकातून होत आहे.
प्रयाग भाविक आणि बच्चे कंपनीसाठी पर्वणीच…
महापुण्यपर्वकाळात स्नान करण्यासाठी विशेषता वारकरी भाविक यांना मोठी पर्वणीच वाटते त्याचप्रमाणे बच्चे कंपनीसाठी देखील प्रयाग यात्रा एक आनंदाची परभणी वाटत असल्याचा अनुभव आहे या ठिकाणी विविध प्रकारचे खेळण्याचे स्टॉल लागल्यामुळे लहान मुलांना ही यात्रा म्हणजे मोठे आकर्षण ठरते.
व्यापारासाठी नव्हे देवाच्या सानिध्यासाठीच…
अनेक वर्षाच्या परंपरेनुसार या ठिकाणी स्टॉल मांडणारे नेहमीचे व्यापारी एक महिनाभर वास्तव्यासाठी या ठिकाणी येतात वर्षानुवर्षे आपण व्यापारासाठी नव्हे तर देवाचे सानिध्य लाभावे या दृष्टीनेच या ठिकाणी व्यापारा निमित्त वास्तव्यास येत असतो त्यामुळे आमच्या संसारात शांतता आणि समाधान प्रस्थापित होते अशी प्रतिक्रिया जेष्ठ महिला कांचन संभाजी गुरव (ज्योतिबा)व्यापारी गुरव यांनी यावेळी दिली
वाहतुकीच्या सोयी. क्षेत्र प्रयाग येथे यात्रेसाठी जाण्याकरिता कोल्हापुरातील सोन्या मारुती चौक आणि गंगावेश येथून क्षेत्र प्रयाग पर्यंत रिक्षा वाहतुकीची सोय आहे