प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड व सांस्कृतिक खाते, महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर जयंती साजरी करण्यात आली. शनिवारी कुमार गंधर्व रंगमंदिर येथे जयंतीचा कार्यक्रम झाला.
अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांच्या हस्ते दीपप्रज्वलीत करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कन्नड व सांस्कृतिक खात्याच्या उपसंचालिका विद्यावती बजंत्री, भोवी व•र समाजाचे अध्यक्ष के. एस. ममदापूर, सचिव शंकर हादीमनी, एल. जी. गाडीव•र आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. सरस्वतीदेवी भगवती यांची शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारे व्याख्यान झाले. लोक आळशी बनू नये, ते नेहमी सक्रिय असावेत, लोकहितासाठी प्रत्येकांनी झटावे, असे सांगणारे ते एक थोर अध्यात्म पुरूष होते. माणसांनी एकमेकांना मदत करावी, हे सिद्धरामेश्वरांचे तत्त्व होते. महात्मा बसवेश्वरांइतकेच ते प्रमुख संत होते, असेही त्या म्हणाल्या.









