वृत्तसंस्था/ कौलालंपूर
2023 च्या बॅडमिंटन हंगामातील येथे सुरू झालेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या मलेशिया खुल्या 750 दर्जाच्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांचे पुरुष दुहेरीतील आव्हान उपांत्यफेरीत समाप्त झाले.
पुरुष दुहेरीच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात 17 वी मानांकित जोडी चीनची लियांग केंग आणि वेंग चेंग यांनी भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांचा 21-16, 11-21, 21-15 अशा गेम्समध्ये पराभव केला. सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीने शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात विश्व टूर फायनल्स स्पर्धेतील विजेत्या लियो चेन आणि ओयु ई यांचा पराभव करत उपांत्यफेरी गाठली होती.









