नवी दिल्ली
ः इंडियन ओव्हरसीज बँकेच्या सीईओपदी अजयकुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारीसह ते व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारीदेखील सांभाळणार आहेत. ऑक्टोबर 2017 पासून ते बँकेत कार्यकारी संचालक म्हणून सेवा बजावत आहेत. अलाहाबाद बँकेत 1991 मध्ये त्यांनी बँकिंग क्षेत्रात पदार्पण केले होते. प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून नोकरीस सुरुवात केली होती.









