वाकरे। प्रतिनिधी
Kumbhi Kasari Co Operative Sugar Factory Election 2023 : कुडीत्रे (ता.करवीर ) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक “कुंभी कासारी बचाव मंच” स्वतंत्रपणे लढवणार असल्याची घोषणा मंचचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव खाडे यांनी केली.कुडित्रे येथे गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या कुंभी कासारी बचाव मंचच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीतअध्यक्ष बाजीराव खाडे यांनी ही घोषणा केली.
यावेळी बोलताना खाडे म्हणाले की, गेले अनेक दिवस विरोधकांचे सर्वसमावेशक पॅनल करण्यासाठी वेळ दिला,मात्र कोणाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागल्याचे ते म्हणाले. सर्वांना बरोबर घेऊन आपण हे पॅनल करणार असल्याचे ते म्हणाले.भविष्यात परिसरातील नेते मंडळी यांच्या सूचना विचारात घेऊन आपण योग्य विचार करू आणि पॅनलची घोषणा करू असे ते म्हणाले.
यावेळी प्रा.बाजीराव पाटील (कुडित्रे ),पी.आर.पाटील (बहिरेश्वर)यांनी मनोगत व्यक्त केले.धीरज पाटील,दादासो पाटील,जालिंदर पाटील (कुडित्रे),कृष्णात पाटील (वाकरे),युवराज पाटील (कोपार्डे),बळीराम चव्हाण बाजीराव पाटील (कोगे),राजवर्धन पाटील (पाडळी खुर्द ),मनोहर पाटील (साबळेवाडी),तुकाराम भुयेकर (यवलुज),शिवाजी पाटील (माजगाव),निवास पाटील (कसबा ठाणे),सरदार बाडे,शामराव पाटील (पुनाळ),प्रकाश पाटील (मरळी),विलास बोगरे (सुळे),विकास पाटील (कोतोली)हे उपस्थित होते.
Previous Articleसमीक्षा, कोमल यांना युनिव्हर्सिटी ब्ल्यू
Next Article आदी, दिशा, आरोही यांचे जलतरण स्पर्धेत यश









