नाशिक विधान परिषदेच्या जागेसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यपुर्ण घडामोडी घडल्या. महाविकासआघाडीचा घटकपक्ष असेलेला कॉंग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागेवर डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी घोषित झाली होती. त्यानंतर डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाचा एबी फॉर्म येऊनही त्यांनी ऐनवेळी माघार घेतली आणि आपला मुलगा डॉ. सत्यजित तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज नाशिकच्या विभागीय कार्यालयात दाखल केला. सुधीर तांबे हे नाशिक मतदार संघातून कॉंग्रेसचे प्रतिनिधीत्व करत होते.
विभागीय कार्यालयाच्या बाहेर माध्यमांशी बोलताना बोलताना उमेदवार सत्यजीत तांबे म्हणाले, “मीच नाशिक विधान परिषदेसाठई निवडणुक लढवावी अशी कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्यांची ईच्छा होती. पण काही तांत्रिक कारणामुळे माझा एबी फॉर्म आला नाही म्हणुन मी अपक्ष अर्ज दाखल केला. जरी मी अपक्ष म्हणुन लढणार असलो तरी मी कॉंग्रेसचाच उमेदवार आहे. या नंतर मी सर्व पक्षाच्या नेत्यांना भेटणार भेटणार असून त्यांनी मला उदात्त हेतूने मदत करावी यासाठी प्रयत्न करणार आहे.”
भाजपच्या नेत्यांना भेटणार का ? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सत्यजीत तांबे म्हणाले, ” अद्याप मी कोणालाही भेटलो नाही, पण मी महाविकास आघाडीच्य़ा नेत्यासह इतरही नेत्यांना य़ेत्या काळात भेटणार आहे. भाजपच्या ही नेत्यांना मी भेटणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचे माझ्यावर प्रेम आहे हे सर्वांनी पाहीले आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता 22 वर्षापासून युवावर्गासाठी काम करत आहे. त्यामुळे उदात्त हेतूने त्यांनी मला मदत करावी.” अशी भावना त्यांनी व्यक्त केली