Bhajan Competition organized by Sateri Puravantari Cultural Arts-Sports Mandal
श्री पुरांवतारी देवस्थान माटणे येथे तेथील श्री सातेरी पुरांवतारी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळातर्फे शनिवार दि. २१ जानेवारी रोजी तालुकास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भजन पारंपारिक भक्तीरसपूर्ण असावे. प्रत्येक संघासाठी ३५ मिनिटांचा कालावधी असेल. सदस्य संघ सदस्य संख्या कमीत कमी ८ व जास्तीत जास्त १२ असावे. तीन गायक असावे. भजनात श्लोक, नमन, रूपक, ध्यान नामाचा अभंग, दुसरा अभंग व गवळण, हिंदी, मराठी गीतांच्या चालीवर असू नये, हातपेटी असावी. इलेक्ट्रॉनिक वाद्य वापरू नये. तबला किंवा पखवाज एकच वाद्य वापरावे. प्रत्येक संघाने साहित्य स्वतः आणावे. प्रवेश मोफत असून प्रवास खर्च दिला जाणार नाही. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक रुपये ७००० सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, द्वितीय पारितोषिक रुपये ५००० सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, तृतीय पारितोषिक रुपये ३००० सन्मानचिन्ह व तसेच उत्तेजनार्थ बक्षीचे आहेत. उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट द्वितीय गायक, उत्कृष्ट तबला, पखवाज, हार्मोनियम, गवळण, कोरस यासाठी वैयक्तिक पारितोषिक आहेत. सर्व रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
दोडामार्ग – वार्ताहर









