देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री (Devendra Fadnavis) असतानाही ते आमच्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Maharashtra CM) आहेत आणि तेच महाराष्ट्राचा विकास करू शकतील असे मत अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) व्यक्त केले. त्या आज अमरावतीमध्ये भाजपच्या (BJP) मेळाव्यात बोलत होत्या. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडीयावर चांगलाच व्हायरल होत असून त्याची चर्चा होत आहे.
भाजप मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्या म्हणाल्या “आमच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दिल्लीत आहेत आणि देवेंद्र फडणवीस राज्यात आहेत. देवेंद्र फडणवीस गोवा किंवा गुजरातमध्ये कुठेही जातात आणि न्यायासाठी लढतात. फडणवीस साहेब, महाराष्ट्राचा विकास तुम्हीच करू शकता.” असे त्या म्हणाल्या.
पुढे बोलताना कार्यकर्त्यांना उद्देशून त्या म्हणाल्या कि, “आपण देवेंद्र फडणवीस यांच्य़ा पाठीशी उभे राहिले पाहिजे. आपण उपमुख्यमंत्री आहात पण तुमच्या कामाचा आवाका आणि तुम्ही ज्या पद्धतीने आम्हा सर्वांसाठी काम करता ते पाहून आमच्यासाठी तुम्हीच मुख्यमंत्री आहात यात काही शंका नाही.” असे खासदार राणा म्हणाल्या. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








