मुंबई
स्नीडर इलेक्ट्रिक कंपनीचा समभाग मंगळवारी शेअरबाजारात दमदार तेजी दाखवताना दिसला. कंपनीचा समभाग मंगळवारी बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 14 टक्के वाढत 202 रुपयांवर पोहचला होता. हा समभाग आता 7 वर्षानंतर सर्वोच्च पातळीवर व्यवहार करत असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. गेल्या 12 सत्रामध्ये सदरचा समभाग 44 टक्के इतका वाढला आहे. बाजारात नकारात्मक कल असतानादेखील हा समभाग तेजीत असल्याचे पाहायला मिळाले.









