विरोधकांचे सभापतींना पत्र
प्रतिनिधी /पणजी
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सभापती रमेश तवडकर यांना पत्र सादर करून येत्या 16 जानेवारीपासून सुरू होणाऱया विधानसभेच्या अधिवेशनाबाबत त्यांनी उपस्थित केलेल्या विविध चिंता कामकाज सल्लागार समितीसमोर (बीएसी) मांडण्याचे आवाहन केले आहे.
विस्तारित अधिवेशन, म्हादेईवर चर्चा, खाजगी सदस्य दिन आणि गोव्याचे प्रश्न मांडण्यासाठी विरोधकांना संधीचे वाटप यासाठी युरी यांनी आपल्या पत्रात म्हादईच्या मुद्यावर चर्चेसाठी पुरेसा वेळ देऊन अधिवेशनाचा कालावधी आणखी दोन ते तीन आठवडय़ांपर्यंत वाढवावा, असे आवाहन केले आहे. त्यांनी 20 डिसेंबर 2022 चे विधानसभेचे बुलेटिन मागे घेण्याची मागणी केली आह,s जी आमदाराकडून मागितली जाणारी माहिती केवळ पाच वर्षांपर्यंत मर्यादित ठेवली आहे. गोवा फॉरवर्ड पक्षानेही सभापतींना पत्र लिहून म्हादईवर चर्चेची मागणी केली आहे.
संख्याबळाअभावी केंद्राचे कर्नाटकाला झुकते माप : खलप

कर्नाटककडे गोव्याच्या तुलनेत मोठे राजकीय संख्याबळ आहे. त्यामुळे म्हादईप्रश्नी केंद्राने कर्नाटकच्या पारडय़ात झुकते माप टाकले आहे. कर्नाटकात विधानसभा निवडणुका होणार असल्याने याचा लाभ उठवत कर्नाटकच्या नेत्यांकडून भावनिक पद्धतीने म्हादईचा विषय मांडला जात आहे. त्यामुळे म्हादईचा विषय सोडवायचा झाल्यास गोव्यातही भाजपच्या नेत्यांनी खंभीरपणे लोकांसोबत राहूनच केंद्रावर दबाव आणायला हवा, असे माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांनी सांगितले.









