युवराज लखमसावंत भोंसले यांच्या हस्तेे उद्घाटन.
Organization of inter-class annual sports competitions in Shree Pancham Khemraj College
श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने आंतरवर्गीय वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन महाविद्यालयामध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल, आय क्यु ए सी कॉर्डिनेटर डॉ. बी एन हिरामणी, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. सी ए नाईक, समिती सदस्य डॉ. जी एस मर्गज ,प्रा. सौ.सुनयना जाधव , प्रा.आर.बी.शिंत्रे, प्रा.व्ही.जी.बर्वे,प्रथमेश परब व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हॉलीबॉल स्पर्धेमध्ये द्वितीय वर्ष आयटी च्या संघाने विजेतेपद मिळवले.
सावंतवाडी / प्रतिनिधी









