वार्ताहर /शिवोली
पेडणे तालुका भंडारी समाजाच्या नूतन समितीची नुकतीच नियुक्ती झाली. मांद्रे येथील प्रदीप हडफडकर यांची अध्यक्षपदी तर दयानंद मांद्रेकर (तुये), तुकाराम हरमलकर (धारगळ), प्रवीत वायंगणकर (हरमल) व राघोबा कांबळी (वारखंड) यांना उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले.
तसेच सचिव तातोबा तळकर (केरी), रुद्रेश नागवेकर (पेडणे), गुरुदास पांडे (पार्से) यांची उपसचिवपदी नियुक्ती झाली. महादेव हरमलकर (मांद्रे) यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली व अजित मोरजकर (पार्से) यांची उपखजिनदार म्हणून नियुक्ती झाली.
शाबा गोवेकर (चोपडे), दत्ताराम पालयेकर (पालये), प्रशांत नाईक (मांदे), सागर पोके (मोरजी), सुरज नाईक (केरी) व मनोहर तळावणेकर (वारखंड) यांची कार्यकारी सदस्य म्हणून नियुक्ती झाली.
भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक, उपाध्यक्ष देवानंद नाईक व खजिनदार जोगुसो नाईक व इतर यांच्या उपस्थितीत समितीची नियुक्ती करण्यात आली.









