प्रतिनिधी /पणजी
आपल्या अभिनय कौशल्याने तियात्र व मराठी, हिन्दी, कोंकणी, इंग्रजी नाटके तसेच चित्रपटांद्वारे लौकीक संपादन केलेले गोमंतकीय कलाकार प्रदीप आनंद नाईक (करमळी, तिसवाडी) यांना ऍन इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ऍन्ड कॅटरिंग टेक्नोलॉजी, गोवा या शैक्षणीक संस्थेतर्फे ’उत्कृष्ट कोंकणी अभिनेता पुरस्कार 2022 ; म्हापसा येथील हनुमान नाटय़गृहात नुकताच इन्स्टिटय़ूचे अध्यक्ष आनंदराव नारायणराव नागवेकर यांच्या हस्ते कॉमेडियन जॉयल यांच्या ’इनास’ या तियात्राच्या प्रयोगाच्या मध्यंतर काळात वितरित करण्यात आला.
प्रदीप आनंद नाईक यांनी आपल्या वयाच्या पांचव्या वर्षापासुन अभिनयास सुरवात केली. आकाशवाणी व दुरदर्शनवर त्यांनी आजवर अनेक कार्यक्रम सादर केले असुन, मराठी, कोंकणी, हिन्दी एकांकिका व नाटके तसेच तियात्र आणि चित्रपटांमधील भुमिकांतुन भरीव यश संपादन केले आहे. याशीवाय अनेक लघुपट, मालीका व जाहिरातपटातही त्यांनी कामे केली आहेत.
वैयक्तिक अभिनयासाठी गोवा कला अकादमी व गोवा तियात्र अकादमीचे विविध पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाची रौप्य पदके व पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक राज्यात स्थानीक संस्था?नी आयोजित केलेल्या एकांकिका व नाटय़स्पर्धांतही त्यांनी अनेक पारितोषीके मिळवीली आहेत. गोव्यासोबतच भारतातील विविध राज्यांत तसेच दुबई, मस्कत, बेहरीन, अबु धाबी, कुवेत, दोहा कतार व लंडन येथील रसिकांनाही त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याने रिझवीले आहे.









