प्रतिनिधी/ रायगड
रायगड जिल्हय़ातील काशीद समुद्र किनाऱयावर सहलीसाठी आलेल्या औरंगाबाद जिल्हय़ातील माध्यमिक शाळेतील 80 विद्यार्थ्यांपैकी 2 मुलांचा येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी तीन च्या दरम्यान ही दुर्घटना घडली.
प्रणव कदम व रोहन बेडवाल अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.
औरंगाबाद जिह्यातील कन्नड तालुक्यातील सानेगुरुजी महाविद्यालयातील माध्यमिक शाळेची इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची सहल काशीद समुद्र किनारा आली होती. सुमारे 80 विद्यार्थ्यांचा हा समूह हा काशीद समुद्र किनारी उतरला होता.
यापैकी पाचजण काशीद पोहण्यासाठी उतरले होते.पोहता – पोहता हे पाचहीजण खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. जवळच असणाऱया लोकांना मुले बुडत असल्याचे लक्षात येताच त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडय़ा टाकल्या व पाचपैकी तिघांना समुद्र किनारी सुखरूप आणण्यात आले.त्यांना तातडीने रुग्णलयात उपचारासाठी भरती करण्यात आले.
तर उर्वरित दोघेजण खोल पाण्यात गेल्याने त्यांना वाचवणे शक्य झाले नाही.यापैकी एकाचा मृतदेह त्वरित सापडला तर दुसरा मुलगा हा सापडत नव्हता.यासाठी स्थानिक नागरिक पोलिसांच्या मदतीने शोध कार्य सुरु ठेवल्यानंतर काही तासानंतर दुसरा मुलगा सुद्धा सापडला.









