मुंबई
घडय़ाळ, दागिन्यांची निर्मिती करणाऱया टायटन कंपनीचा समभाग शेअरबाजारात सोमवारी घसरणीत राहिल्याचा पाहायला मिळाला. कंपनीचा समभाग सोमवारी बीएसईवर 3 टक्के घसरत 2470 रुपयांवर खाली आला होता. गेल्या 3 महिन्यात हा समभाग 9 टक्के इतका घसरला आहे. कंपनीच्या दागिन्यांच्या विभागाने डिसेंबर तिमाहीअखेर विक्रीत 11 टक्के इतकी वाढ दर्शवल्याचे कळते. जास्त किंमतीचे दागिने त्याचप्रमाणे नव्या डिझाइनर सादर केलेल्या दागिन्यांना मागच्या तिमाहीत ग्राहकांनी दमदार प्रतिसाद नोंदवल्याची माहिती देण्यात आली आहे.









