Weather Update : कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसापासून थंडीचा कडाका अधिक जाणवू लागला आहे. रविवारी (ता. 8) रात्री दहानंतर तापमान 18 अंश सेल्सियसपर्यंत गेले होते. त्यामुळे पुढील चार दिवस जिल्ह्यात थंडीचा जोर कायम राहिल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर उत्तर भारतात थंडीची लाट असताना रविवारी देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी तापमानाची नोंद राजस्थानच्या चुरू येथे ०.५ अंश सेल्सिअस झाली. सध्या उत्तर राजस्थान, दिल्ली, हरियाना, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या ठिकाणी थंडीची लाट आली आहे. तर पश्चिमी चक्रावातामुळे उत्तरेकडील हिमालयातील काही भागात बर्फवृष्टी/पावसाची स्थिती दिसून येत आहे. यामुळे हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, तेलंगण या राज्यांच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ईशान्येकडील राज्यात दाट धुक्याची स्थिती राहण्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला.
दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीचा कडाका वाढत आहे. नागपूर, गोंदिया येथे थंडीची लाट पसरलीय. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद गोंदिया येथे ६.८ अंश सेल्सिअस इतकी झाली. विदर्भात बहुतांश ठिकाणी किमान तापमानात ३ ते ५ अंशांनी, तर मराठवाड्यात १ ते ४ अंशांनी घट झाली. पूर्व विदर्भातील नागपूर,वर्धा,भंडारा,गोंदिया,अमरावती,बुलडाणा जिल्ह्याच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.तसेच पुढील दोन दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी,तसेच मराठवाडा परिसरात बहुतांश भागात तापमानात घट अपेक्षित असून किमान तापमान १० अंशांच्या खाली जाऊ शकते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








