वृत्तसंस्था/ ऍडलेड
जपानची अव्वल महिला टेनिसपटू तसेच दोनवेळा ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा नाओमी ओसाकाने 16 जानेवारीपासून सुरू होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे.
माजी टॉप सिडेड ओसाकाचे ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या खेळाडूंच्या प्रवेश यादीत नाव यापूर्वी होते. पण तिने या स्पर्धेत आपण खेळणार नसल्याचे रविवारी जाहीर केले आहे. ऍडलेड तसेच होबार्ट होणाऱया सरावाच्या टेनिस स्पर्धामध्ये तिच्या सहभागाविषयी साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. ओसाकाने 2019 आणि 2021 साली ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली होती. 2021 च्या प्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेनंतर तिने मानसिक आजारामुळे टेनिस क्षेत्रातून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता.









