रायगड प्रतिनिधी
महाड मधील मुंबई गोवा महामार्गावरील पी जी रिजेन्सी हॉटेल एन्ड रिसॉर्ट या ठिकाणी काम करणाऱ्या व्यवस्थापकाने हॉटेल मध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या बिलाची रक्कम हॉटेल च्या खात्यात न जमा करता आपल्या कडे ठेवली.ही घटना एप्रिल २०२२ ते अक्टोबर २०२२ या दरम्यान घडली आहे.
महाड शहरा नजीक प्रशांत कांतीलाल गुजर रा. महाड यांचे पी जी रिजेन्सी हॉटेल एन्ड रिसॉर्ट हॉटेल असून मोहित सतीश बाली रा.नाशिक हा या ठिकाणी जनरल मॅनेजर म्हणून काम करत होता. बाली यांने या हॉटेल मध्ये येणाऱ्या ग्राहकांकडून एप्रिल २०२२ ते अक्टोबर २०२२ या दरम्यान ५, ८७००८ जी बिलांची रक्कम अदा झाली ती त्यांनी हॉटेल च्या बँक खात्यात न भरता आपल्या कडेच ठेवली .या प्रकरणी गुजर यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात बाली यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून भादवी कलम ४२०/४०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.