50th Taluk Level Science Exhibition at Shantadurga Secondary School, Pikule
पिकुळे येथील श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालयात मंगळवार दि १० जानेवारी व बुधवार दि ११ जानेवारी रोजी ५० व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तंत्रज्ञान आणि खेळणी हा या प्रदर्शनाचा विषय आहे.मंगळवारी सकाळी १० वाजता नोंदणी, ११ वाजता उद्घाटन सोहळा होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक विवेकानंद नाईक यांच्या हस्ते उद्घाटन, तर अध्यक्ष म्हणून गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, प्रमुख अतिथी म्हणून या प्रशालेचे माजी मुख्याध्यापक अन्वर खान, तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, प्रदीपकुमार कुडाळकर, तहसीलदार अरुण खानोलकर, धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर, सहसचिव नंदकुमार नाईक, सावळाराम गवस हे उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२:३० वाजता निबंध स्पर्धा, २:३० वाजता वक्तृत्व स्पर्धा संपन्न होणार आहे.
बुधवारी सकाळी १० वाजता विज्ञान प्रतिकृतीचे परीक्षण व प्रश्नमंजुषा, दुपारी ३ वाजता पारितोषिक वितरण व समारोप कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी मकरंद तोरसकर, प्रमुख अतिथी म्हणून न्यू इंग्लिश स्कूल मडुराचे माजी मुख्याध्यापक सदाशिव गवस व गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापिका स्नेहल गवस यांनी केले आहे.
दोडामार्ग – प्रतिनिधी