सांगेली युवा विकास प्रतिष्ठानचे आयोजन
सांगेली येथील युवा विकास प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षीप्रमाणे रविवारी सांगेली प्राथमिक शाळेत आयोजित केलेल्या ७ व्या रक्तदान शिबिरात ४८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपिठावर सांगेली नवनिर्वाचित सरपंच लवू भिंगारे, उपसरपंच संतोष नार्वेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ, माजी उपसरपंच रमाकांत राऊळ, सांगेली माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रामचंद्र घावरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर सांगेलकर, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी तालुका सचिव बाबली गवंडे, सावंतवाडी रक्तपेढीच्या डॉ सौ बागेवाडी, टेक्निशन सौ रेडकर, अनिल खाडे, माजी उपसरपंच वामन नार्वेकर, जानू पाटील, माजी सैनिक बाबुराव कविटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिराचे नियोजन युवा विकास प्रतिष्ठानचे लक्ष्मण रेमुळकर, महेश रेमूळकर, पंढरी सावंत, गिरीधर राऊळ, पुंडलिक राऊळ, आशिष अमरे, शिवप्रसाद सावंत, सचिन राऊळ, संतोष सावंत, राजन कुंभार, मानेत डिसोझा, गुरूनाथ कुंभार आदींनी केले.
ओटवणे प्रतिनिधी