सलग 26 व्या वर्षी कलावलय वेंगुर्ले संस्थेचे आयोजन
Inauguration of Yarnalkar Smriti Open State Level Singles Competition in Vengurle
कलावलय वेंगुर्लेने या ग्रामीण भागातील संस्थेने सलग 26 वर्षे एकांकीका स्पर्धेच्या माध्यमातून नाटय़ कलाकारांना घडविण्याचे काम केलेले आहे. स्पर्धा भरविणे हे किती कठीण असते. हे मला जेष्ठ नाटय़कर्मी असल्याने माहिती आहे. या स्पर्धांना मुंबई, सोलापूर, सांगली, डोंबिवली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्गातील कलाकारांनी सहभाग घेत आपली कला वृध्दींगत करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा कलेस रसिका श्रोत्यांकडूनही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळणे गरजेचे आहे. कारण वर्षभरातtन राज्यस्तरीय नाटय़ स्पर्धा एकदाच होतात. व संपूर्ण वर्षभर नवीन कलाकारांना कला सादर करण्याची संधी मिळत नाही. एकांकीका स्पर्धा या कलाकारांना घडविण्याचे काम करतात. त्यामुळे कलावलय वेंगुर्ले संस्थेचा कलाकारांना घडविण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून योगदान आहे. असे प्रतिपादन गोव्यातील जेष्ठ नाटय़कर्मी देवीदास आमोणकर यांनी वेंगुर्लेत प्रा. शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी केले.
वेंगुर्ले नगरपरीषदेच्या कॅम्प येथील मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय नाटय़सभागृह आयोजित केलेल्या प्रा. शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या उदघाटन गोव्यातील जेष्ठनाटय़कर्मी देवीदास आमोणकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व नटराज प्रतिकास पुष्पहार अर्पण करून झाले. या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांत कलावलय संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ बाळू खामकर, या उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरपरीषदेचे मुख्याधिकारी परीतोष कंकाळ, परीक्षक ज्ञानेश मुळे, रविदर्शन कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, स्विटी यरनाळकर यांचा समावेश होता.
वेंगुर्ले (वार्ताहर)-









