ऑनलाईन टीम / तरुण भारत :
‘भारत जोडो यात्रे’नंतर काँग्रेस आता ‘हाथ से हाथ जोडो अभियान’ सुरू करणार आहे. 26 जानेवारीपासून या अभियानाला सुरुवात होईल. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी जो संदेश देशवाशीयांपर्यंत पोहचवत आहेत, तोच संदेश नव्या प्रचाराच्या माध्यमातून बूथ पातळीवर पोहचवला जाणार आहे.
‘हाथ से हाथ जोडो अभियान’ अभियानाचा माध्यमातून तळागाळातील जनतेपर्यंत पोहचण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. दोन महिने हे अभियान चालणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून काँग्रेसचे नेते पक्ष ब्लॉक, पंचायत आणि बुथवर पोहचून थेट मतदारांशी संवाद साधतील. 2024 च्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्त्वाची मोहीम असेल. ‘भारत जोडो’ नंतरचा हा दुसरा टप्पा राजकीय प्रचारासाठी असणार आहे.
अधिक वाचा : …तर माझ्यावर केसेस दाखल करा; अजित पवारांचे फडणवीसांना आव्हान
ज्येष्ठ नेते पल्लम राजू हे या मोहिमेचे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. 10 जानेवारी रोजी विदर्भात प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीची विस्तारित बैठक होणार आहे. या बैठकीत ‘हाथ से हाथ जोडो’चा राज्यव्यापी कार्यक्रम निश्चित होईल. या अभियानाच्या माध्यमातून विधानसभेची तयारीही केली जाणार आहे.









