केएससीए सेकंड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी/बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए सेकंड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात स्पोर्ट्स अकादमी गदगने हुबळी स्पोर्ट्स क्लब सी चा 115 धावांनी तर सिद्धारुढ स्वामीजी स्पोर्ट्स क्लब हुबळी संघाने आनंद क्रिकेट अकादमीचा 38 धावांनी पराभव करुन प्रत्येकी 2 गुण मिळविले. विष्णू राजापुरम व सचिन पाटील याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
बेळगावच्या केएससीए मैदानावरती खेळविण्यात आलेल्या सामन्यात श्री सिद्धारुढ स्वामी स्पोर्ट्स क्लब हुबळी संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 गडी बाद 286 धावा केल्या. त्यात विष्णू राजापुरमने 5 षटकार 11 चौकारांसह 100 धावा करुन शतक झळकविले. त्याला अभिषेक सप्रेने 58, यल्लाप्पा काळेने नाबाद 32 तर संतोषकुमारने 25 धावा करुन सुरेख साथ दिली. आनंद अकादमीतर्फे अक्षय पाटील व किसन मेघराज यांनी प्रत्येकी 2 तर आदित्य पाटील, आनंद कुंभार, पंकज सुतार यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद क्रिकेट अकादमी संघाचा डाव 43.3 षटकात 248 धावात आटोपला. त्यात आनंद कुंभारने 58, नागेंद्र पाटीलने 45, अक्षय पाटीलने 39, किसन मेघराजने 22 धावा केल्या. सिद्धारुढतर्फे प्रविणकुमार करसगीने 41 धावात 4 तर प्रणव, यल्लाप्पा व संतोषकुमार यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
हुबळी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात स्पोर्ट्स अकादमी गदम संघाने प्रथम फलंदाजी करताना 49.5 षटकात सर्व गडी बाद 286 धावा केल्या. त्यात सचिन पाटीलने 82, शुभम जैनने 62, अस्लम मुधोळने 39 धावा केल्या. हुबळी स्पोर्ट्स क्लब सी तर्फे साबिल हावेरीने 4, अभिजित हरिपूर व विकास पाटील यांनी प्रत्येकी 2 तर समर्थ व जॉन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना हुबळी स्पोर्ट्स क्लब सी संघाचा डाव 33.1 षटकात 171 धावात आटोपला. त्यात अभिजित हिरापूरने 47, विशाल पुजारीने 28 तर हर्षद अली व साबिल हावेरी यांनी प्रत्येकी 21 धावा केल्या. गदगतर्फे अस्लम मुधोळ व सचिन पाटील यांनी प्रत्येकी 3 तर कार्तिकने 2, शिवराजने 1 गडी बाद केला.









