शिरीष गोगटे यांच्या हस्ते होणार सत्कार
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित रोटरी अन्नोत्सव फूड फेस्टिव्हल दरम्यान मि. वर्ल्ड व मि. इंडिया शरीरसौष्ठव स्पर्धेत चमक दाखविलेल्या अनुजकुमार तालियान यांचा खास सत्कार रावसाहेब गोगटे यांच्या स्मरणार्थ शिरीष गोगटे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे 9 रोजी होणाऱ्या रोटरी शरीरसौष्ठव स्पर्धेत अनुजकुमार तालियान आणि इंटरनॅशनल वूमन अॅथलिट कीर्ती पाटील यांची प्रात्यक्षिके सुरेश अंगडी महाविद्यालय येथे सायंकाळी 7 वाजता सादर करण्यात येणार आहेत.









