Minister Sudhir Mungantiwar : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई भेटीवर राज्यातील उद्योगपतींना आणि व्यापाऱ्यांना उत्तर प्रदेशात गुंतवणुक करण्याचे आवाहन केले. त्याच बरोबर त्यांनी मुंबईतील चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांचीही भेट घेऊन उत्तर प्रदेश चित्रपट निर्मितीसाठी कसे अनुकुल आहे हे सुद्धा सांगितले. त्यांनी आपल्या निवेदनात उत्तर प्रदेशमध्ये अकराशे एकरमध्ये उभारल्या जाणाऱ्या फिल्मसीटीमध्ये शुटींगसाठी आमंत्रित केले.
दरम्यान, राज्याचे सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना नागपुरात पत्रकारांना याबाबत विचारले असता, त्यांनी उत्तरप्रदेशमध्ये फिल्म सिटी होणार की नाही ते माहीत नाही. पण मुंबईमध्ये ५२१ एकर जागेत जगातील सर्वात अत्याधुनिक फिल्म सिटी तयार होणार असल्याचे सांगितले.
तसेच मुंबईतील चित्रपटसृष्टी ही उत्तर प्रदेशला जाणार असल्याच्या चर्चा या अफवा असल्य़ाचेही ते म्हणाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, “मुंबईत अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली फिल्म सिटी आपण तयार करत आहोत. तसेच मुंबई विमानतळावर विविध अत्याधुनिक सोयी आणि सुविधा विकसित करण्यात येणार असून जवळच १०४ स्केअर किमीचा पार्क विकसित होणार आहे. चित्रपट निर्माते इतर ठिकाणी न जाता फिल्म सिटी येथेच राहावी यासाठी प्रयत्न करत आहोत.
फिल्म सिटीसाठी सरकार एक खिडकी योजना आमलात आणणार आहे. त्यामुळे चित्रिकरणाच्या परवानगीसाठी आता एका क्लिकवर सर्व ना हरकत प्रमाणपत्र मिळणार आहेत. चित्रीकरणासाठी ६५ पर्यटन स्थळ विकसित करणार असून चित्रीकरणासाठी काश्मीरला जाण्याची गरज राहणार नाही, असेही मुनगंटीवार म्हणाले.
Previous Articleनंदगड रथोत्सवाला हजारो भाविकांची उपस्थिती
Next Article आर्थिक विकासाचा दर 7 टक्के राहणार








