खानापूर – नंदगड व परिसरातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत विरक्त मठाचा रथोत्सव पार पडला. यावेळी हर हर महादेवाचा गजर भाविकांकडून होत होता. शांततेत व सुव्यवस्थेत रथोत्सव पार पडला.
शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता नंदगड गावातील नागरिक मठासमोरील रथा जवळ जमा झाले. मठाचे उत्तराधिकारी चन्नवीर देवरू यांच्या हस्ते मठाचे पूजन झाले. यानंतर गावातील 21 हक्कदारांनी श्रीफळ वाढवले. तसेच विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांनी श्रीफळ वाढवले. त्यानंतर रथोत्सवाला सुरुवात झाली. दगडी चाके असलेला लाकडी रथ फुलांच्या मळानी सजवण्यात आला होता. यासाठी फुलांच्या माळा बनवणारे दावणगेरी वरून खास लोक आणण्यात आले होते.त्यांनी आकर्षक माळा बनविल्या होत्या. मठाचे भाविक मोहन हिरेमठ यांनी फुलांच्या माळा सजवण्याचा सर्व खर्च उचलला होता.
आंबोत्या व केळीच्या झाडांचे रोप रथाला बांधण्यात आले होते. रथावर थांबलेल्या मान्यवरांच्या सूचनेनुसार रथ ओढण्यात येत होता. रथ ओढण्यासाठी दोन्ही बाजूला लांब दोर बांधण्यात आले होते. त्यांच्या सहाय्याने रथ ओढला जात होता. रथाचे वजन व उंची अधिक होती. रथ जसा जसा पुढे जात होता तसे रथावर खडीसाखर, खारीक, केळी भाविकांकडून उडविण्यात येत होती. मठापासून नियोजित स्थळापर्यंत रथ ओढण्यात आला. रथोत्सवानिमित हिरेमुनवळीचे प्रभू शिवलिंग शिवाचार्य स्वामीं, चिक्कमुनवळीचे शिवपुत्र स्वामी, आरळीकट्टी मठाचे शिवमुर्ती स्वामी, आवरोळी मठाचे चन्नबसवदेवरू स्वामी, देवरशिगेहळी मठाचे वीरेश्वर स्वामी, कुळवणी मठाचे मल्लिकार्जुन स्वामी उपस्थित होते. वरील स्वामीजींनी रथोत्सवापूर्वी
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









