CM Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईच्या (Mumbai) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आपल्य़ा राज्यात गुंतवणूकीला आकर्षित करण्यासाठी मुंबईत विविध बैठका घेतल्या. या दौऱ्यामध्ये योगी आदित्यनाथ यांनी बॉलिवूडलाही आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी हॉटेल ताज येथे झालेल्या बैठकीत 40 हून अधिक चित्रपट आणि टेलिव्हिजन सेलिब्रेटिंनी भाग घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यामध्ये सुभाष घई, चंद्रप्रकाश द्विवेदी, बोनी कपूर, सोनू निगम, मधुर भांडारकर आणि जॅकी श्रॉफ या दिग्गज कलावंतांचा समावेश आहे.
चित्रपट व्यवसायामध्ये गुंतवणुक वाढवण्यासाठी उत्तर प्रदेशचे महत्व सांगताना योगी आदित्यनाथ म्हणाले, ” 64 व्या आणि 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये उत्तर प्रदेश हे सर्वाधिक चित्रपट- अनुकूल राज्य बनले आहे. आमच्याकडे अनेक नयनरम्य ठिकाणे आहेतच पण कला क्षेत्रात राज्याचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. पायाभूत सुविधांसाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ, चौपदरी महामार्ग आणि मेट्रो मार्ग विकसित करण्यात येत आहेत. उत्तर प्रदेश सरकार वेब सिरीजसाठी 50 टक्के सबसिडी आणि स्टुडिओ प्रयोगशाळांसाठी 25 टक्के सबसिडी देत आहे.” असे सांगून त्यांनी सरकार बांधत असलेल्या 1,000 एकरच्या फिल्मसिटीमध्ये शूटिंगसाठी बॉलीवूडला आमंत्रित केले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









