वृत्तसंस्था/ सिडनी
युनायटेड चषक सांघिक टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने स्पेनवर 3-2 अशी मात केली. जॉन पीयर्स व समंथा स्टोसूर यांनी मिश्र दुहेरीच्या निर्णायक सामन्यात जेसिका बुझास मॅनीरो व डेव्हिड वेगा हर्नांडेझ यांच्यावर 6-2, 6-3 अशी मात केली.
या संपूर्ण सामन्यात ऑस्ट्रेलियन जोडीने पूर्ण वर्चस्व राखत 58 मिनिटात सामना संपवला. फर्स्ट सर्व्हवर त्यांनी 97 टक्के गुण मिळविले. गट ड मध्ये ग्रेट ब्रिटन अव्वल ठरले असल्याने ऑस्ट्रेलिया किंवा स्पेन दोघांनी आगेकूच करता आली नाही. या लढतीतील पहिल्या सामन्यात पॉला बेडोसा जखमी झाल्याने ऐनवेळी बुझास मॅनीरोला संधी देण्यात आली. तिने पहिल्या सामन्यात ऑलिव्हिया गॅडेकीचा 6-2, 6-2 अससा पराभव केला.









