Sharad Pawar महागाई आणि बेरोजगारीपासून लोकांचे लक्ष वळविण्यासाठी भारतीय जनता पक्ष (BJP) जातीय मुद्दे उपस्थित करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ( NCP ) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मंगळवारी केला.
बारामतीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पवार यांनी भारतीय जनता पार्टीला लक्ष केले. ‘लव्ह जिहाद’(Love Jihad) वर भाष्य करताना म्हणाले की, “सत्तेवर असलेल्या सरकारमधील लोकांना सर्वसामान्यांच्या हिताला बाधा पोहोचणाऱ्या मूलभूत समस्यांपासून दुसरीकडे लक्ष विचलित करायचे आहे. त्यामुळेच लव्ह जिहादसारखे मुद्दे समोर आणण्याचा प्रयत्न होत आहे. अलीकडेच भाजप नेत्यांनी अन्य भाजपशासित राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही धर्मांतरविरोधी कायदा ( Anti Conversion Law ) आणावा, अशी मागणी केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपले मत व्यक्त केले.
डिसेंबरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मांतराच्या विरोधात इतर राज्यांनी आणलेल्या कायद्यांचा अभ्यास करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांनी हे विधान श्रद्धा वालकर खून प्रकरणावर केले होते.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेला वादावरही भाष्य केले. जोपर्यंत संभाजी महाराज स्वराज्याच्या रक्षणासाठी लढले, यावर लोकांचा विश्वास आहे तोपर्यंत त्यांना संभाजींना धर्मवीर म्हणण्यास काहीच हरकत नाही. पण ऐतिहासिक वस्तुस्थिती लक्षात घेता छत्रपती संभाजींना ‘स्वराज्य रक्षक’ म्हणण्यात काहीही गैर नाही, असे शरद पवार म्हणाले.
Previous Article‘सामना’ला बाळासाहेब ठाकरेंचे नाव लिहिण्याचा अधिकार नाही…
Next Article बेळगावहून सुरु होणार काँग्रेसची बसयात्रा








