अर्चना बनगे, प्रतिनिधी
Easy Saree Draping Tips : साडी वेअर करण सगळ्याच स्त्रियांना आवडतं. कोणताही कार्यक्रम असो की अगदी सहजच साडी नेसून, ज्वेलरी घालून फोटोशूट करण्याचा अनेकांना जणू छंदच असतो. यात मग सिल्क, कॉटन, वर्क अशा अनेक प्रकारच्या साड्या वेअर केल्या जाता. मात्र लग्न समारंभ, महिलांचे हळदी-कुंकू, विशेष उपवास अशा प्रसंगी कॉटनच्या साड्यांना प्राधान्य दिलं जातं.
कॉटनची साडी सोबतच महाराष्ट्रीय लूक कार्यक्रमाची शोभा वाढवतोच शिवाय स्वत:मध्ये एक आत्मविश्वास वाढवतो. कॉटनची साडी सुंदर दिसते मात्र साडी वेअर केल्यानंतर ती पाठीमागून वर उचलली जाते म्हणून अनेकदा साडी संदर असूनही ती नाकारली जाते. किंवा कधी-कधी कार्यक्रमात साडी फोल्ड झाल्याने थोड अवघडल्यासारख वाटत. तुम्हाला कॉटनची साडी वेअर करता यावी तसेच ती फोल्ड होणार नाही यासाठी काही ट्रिक्स देणार आहोत. चला तर जाणून घेऊय़ा.
कॉटनची साडी नेसताना अशी घ्या काळजी
-कॉटनची साडी नेसत असताना ती प्रेस करुन घ्यावी.
-साडी नेसताना पदराला व्यवस्थित पिनअप करून घ्यावे.
-ज्या पध्दतीने पदराला पिनअप करून फिट केले जाते तसेच निऱ्यांना देखील पिनअप करून घ्या.
-साडी पूर्ण नेसूण झाल्यावर पाठीमागे पेटीकोट आणि साडीला मोठ्या दोन पिना लावून घ्या. मागून साडीला पिनअप केल्याने साडी फोल्ड होत नाही.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









