महाराष्ट्रातील भांडुप झोनसाठी वीज वितरण परवाना मागणाऱ्या अदानी वीज कंपनीच्या विरोधात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) च्या कर्मचारी संघटनेने मंगळवारी मध्यरात्रीपासून तीन दिवसीय संप पुकारला आहे. हा संप 3 दिवस चालणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रातील वीज वितरणामध्ये अदानी कंपनीला प्रवेश देऊन सरकार आणू पहात असलेल्या खाजगीकरणाच्या विरोधात कामगारांनी एल्गार पुकारला आहे. महावितरणच्या कर्मचारी युनियनने दावा केला की, “हा विरोध कर्मचार्यांच्या हितासाठी नसून तो प्रामुख्याने ग्राहकांच्या हितासाठी आहे. जर आता हस्तक्षेप केला नाही तर खाजगी कंपन्या मैदानात उतरून वीज शुल्क आणखी वाढू शकते.” सोशल मीडियाच्य़ा माध्यमातून महावितरणच्या युनियनने आपल्या संपाबाबत नागरिकांना आणि ग्राहकांना सतर्क केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








