Inauguration of Devotee Nivas at Degve Sthapeshwar Temple
डेगवे येथे स्थापेश्वर मंदिर जवळ क वर्ग पर्यटन मधून शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या प्रयत्नातुन भक्तनिवस साठी २० लाख रुपये मंजूर झाले होते. भक्त निवासाचे काम पूर्ण झाले तसेच खासदार विनायक राऊत यांचा प्रयत्नातुन सार्वजनिक विहिरी साठी १० लाख मंजूर झाले होते दोन्ही कामे पूर्ण झाली.
दोन्ही कामांचे उद्घाटन डेगवे सरपंच वैदेही देसाई यांच्या हस्ते झाले यावेळी सरपंच मंगलदास देसाई माजी उपसरपंच मधुकर देसाई विवेक केसरकर सुनिल देसाई पोलीस पाटील प्रमोद देसाई देवस्थानचे मानकरी रामा देसाई उत्तम देसाई मधुकर उमाजी देसाई उत्तम बाळा देसाई सुभाष देसाई वामन देसाई सखाराम देसाई विश्वनाथ मेस्त्री शामसुंदर देसाई पंकज देसाई योगेश मांजरेकर विजय देसाई सुप्रिया देसाई शालन देसाई वैशाली देसाई सुविधा चव्हाण रुपाली प्रकाश देसाई गौरी विष्णू देसाई जानकी देसाई यावेळी उपस्थित होते.
सावंतवाडी / प्रतिनिधी









