प्रतिनिधी/ रत्नागिरी
तालुक्यातील कोतवडे घारपुरेवाडी येथील तरूणाच्या खून खटल्यात तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची साक्ष घेण्यात येणार आह़े बंदुकीची गोळी झाडून खून करण्यात आला होत़ा यामुळे अवैध हत्यार बाळगल्याप्रकरणी आरोपी याच्याविरूद्ध आर्म्स ऍक्टनुसार गुन्हा ग्रामीण पोलिसात दाखल करण्यात आल़ा यासंबंधीची परवानगी तत्कालीन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिली होती. त्यानुसार आता सुनील चव्हाण यांची साक्ष आता न्यायालयापुढे नोंदवली जाणार आह़े
भिकाजी कृष्णा कांबळे (43, ऱा मारगांबेवाडी, कोतवडे) असे बंदुकीने गोळ्य़ा घालून खून करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आह़े 18 एप्रिल रोजी ही खुनाची घटना घडली होत़ी पोलीस तपासामध्ये ऋषीकेश विजय सनगरे (21, ऱा सनगरेवाडी, कोतवडे) यांनेच हा खून केल्याचे उघड झाले होत़े त्यानुसार रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी ऋषीकेश याच्याविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवल़े रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल़ ड़ी बीले यांच्या न्यायालयात हा खटला चालवण्यात येत आह़े सरकारी पक्षाकडून ऍड. पुष्पराज शेटय़े न्यायालयापुढे युक्तीवाद करत आहेत़
भिकाजी रंगकाम करणारे ठेकेदार म्हणून कोतवडे गावात परिचित होत़े भिकाजी यांच्या मुलीसोबत लग्न करण्याची इच्छा ऋषीकेश याने भिकाजी यांच्याकडे व्यक्त केल़ी मात्र या लग्नाला भिकाजी यांनी विरोध दर्शवला होत़ा 18 एप्रिल 2019 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास भिकाजी कांबळे हे रस्त्याने घरी एकटे जात होत़े याचा फायदा घेत गावठी बंदुकीतून भिकाजी यांच्या छातीवर गोळी झाडण्यात आल़ी यावेळी मोठय़ा प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने भिकाजी कांबळे त्यांचा जागीच मृत्यू झाल़ा गोळीच्या आवाजाने ग्रामस्थांनी या ठिकाणी धाव घेतल़ी यावेळी भिकाजी हा रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्य़ात पडल्याचे दिसल़े या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 24 तपास खूनाचा छडा लावत ऋषीकेश सनगरे याला ताब्यात घेतल़े पोलिसांनी तपास करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठवले आह़े त्यानुसार सत्र न्यायालयात हा खटला चालवण्यात येत आह़े भिकाजी सनगरे यांच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले होत़े तसेच मृतदेहाचा पंचनामाही करण्यात आला होत़ा शवविच्छेदन अहवालानुसार भिकाजी यांचा मृत्यू हा गोळी लागल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले होत़े
या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी ऋषीकेश याच्याविरूद्ध भादंवि कलम 302, 341, सह 34, आर्म्स ऍक्ट 3(25), मुंबई पोलीस कायदा कलम 135 नुसार गुन्हा दाखल केल़ा त्याचप्रमाणे संदीप कुमार, छोटेलाल यादव व चंदनकुमार कुशवाह यांच्याविरूद्ध देखील बंदुक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल़ा गुह्याचा तपास करून पोलिसांकडून न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवण्यात आल़े त्यानुसार हा खटला सत्र न्यायालयापुढे चालवण्यात येत आह़े
आर्म्स ऍक्ट दाखल करण्यासाठी जिल्हाधिकाऱयांची परवानगी
ऋषीकेश हा गावात वास्तव्यास असताना त्याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले होत़े या मुलीसोबत लग्नाला भिकाजी यांनी विरोध दर्शवला होत़ा यानंतर लग्न न जमल्यामुळे ऋषीकेश हा कामासाठी मुंबई येथे गेल़ा मात्र लग्नाला झालेल्या विरोधाची आग त्याच्या मनामध्ये धुमसत होत़ी याच रागातून त्याने गावठी बंदुक खरेदी केली होत़ी याच बंदुकीतून ऋषीकेशने भिकाजी यांचा खून केला, असा आरोप ठेवण्यात आल़ा अवैधरित्या बंदुक बाळगल्याप्रकरणी ऋषीकेश याच्यावर आर्म्स ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आल़ा यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची परवानगी घेण्यात आली होत़ी









