Janhavi Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या नातवाला म्हणजेच शिखर पहाडियाला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते दोघे अनेक ठिकाणी एकत्र दिसत आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्यातला एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जान्हवी आणि शिखरने एकत्रच या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्या आधी अनिल कपूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानेही हे दोघे एकत्र दिसले होते. शिवाय बोनी कपूर यांच्यासोबतही शिखरचा फोटो व्हायरल होत आहे.
Previous Article११ लाख विध्यार्थ्यांना मिळणार शिष्यवेतन ; सीएम बोम्मई
Next Article २०२२ मध्ये ‘या’ होत्या ट्रेंडिंग साड्या









