अंमलबजावणी संचालनालया ( ED ) सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा कसा गैरवापर होऊ शकतो याचे “उत्तम उदाहरण” म्हणजे देशमुख आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे अनिल देशमुख (Anil Deshmukh), शिवसेना (ठाकरे गटाचे) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि त्यांच्यासोबत इतरांची नावे प्रामुख्याने घेतली जातील. असे बोलून महाविकास आघाडी (MVA) तील नेत्यांच्या नावांची यादी सांगून राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी, केंद्रिय तपास यंत्रणांच्या या कार्यशैली विरोधात ते लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी () यांना भेटणार असल्याचे सांगितले.
अनिल देशमुख यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत, असे न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्टपणे म्हटल्याचे सांगताना ” हा सत्तेचा दुरुपयोग असून एका कर्तव्यदक्ष आणि सुसंस्कृत व्यक्तीला जवळपास 13 महिने तुरुंगात टाकण्यात आले. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी ही परिस्थिती निर्माण करणाऱ्या लोकांचा विचार करायला हवा,” असे ते म्हणाले. तसेच “भविष्यात अशाच परिस्थितीतून कोणीही जाऊ नये यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार” असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.”
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








