मुंबई
साह पॉलिमर्सचा आयपीओ येत्या शुक्रवारी म्हणजेच 30 डिसेंबरला बाजारात दाखल होणार असून तो 4 जानेवारी 2023 पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असणार असल्याचे सांगितले जाते. कंपनीने याची इश्यु किंमत प्रत्येकी 61 ते 65 रुपये इतकी निश्चित केली आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी 29 डिसेंबर रोजी बोली खुली होणार आहे. कंपनीचा समभाग 12 जानेवारी 2023 रोजी बीएसई व एनएसईवर लिस्ट हेणार आहे.









