कसबा बीड / प्रतिनिधी .
धोंडेवाडी (ता करवीर) गावच्या उपसरपंचपदी माजी आमदार चंद्रदिप नरके गटाच्या अर्चना कृष्णात नलवडे यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत धोंडेवाडी ग्रामपंचायत कार्यालय येथे लोकनियुक्त सरपंच पांडुरंग शंकर नलवडे यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास अधिकारी सुर्यकांत जाधव यांनी उपसरपंच पदासाठी निवडीचे वाचन केले.
यावेळी उपसरपंच पदासाठी एकमेव नाव आलेने धोंडेवाडी गावच्या बिनविरोध उपसरपंच पदी अर्चना नलवडे यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाजीराव पौंडकर, खंडू नलवडे, राजाराम नलवडे, आंबुबाई पौंडकर, शोभा नलवडे, अपर्णा नलवडे या सदस्यांची उपस्थिती होती. यावेळी राकेश नलवडे, प्रसाद नलवडे,निवास नलवडे, चंदर नलवडे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे दिग्विजय नलवडे यांनी आभार मानले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









