राष्ट्रवादी कॉंग्रसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख हे आज जवळजवळ 1 वर्ष 1 महिन्यांनी तुरूंगाबाहेर आले. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक दिग्गज ऑर्थर रोड तुरूंगाजवळ उपस्थित होते. उच्च न्यायालयाने 12 डिसेंबरच्या आदेशाला स्थगिती देण्याची केंद्रीय अन्वेषण विभागाची (सीबीआय) विनंती फेटाळल्याने आमदार देशमुखांचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला होता.
देशमुखांचे वकिल इंद्रपाल सिंग यांनी मंबई सत्र न्यायालयातून रिलिज ऑर्डर मिळवली. त्यानंतर त्यांनी ही ऑर्डर आर्थर रोड तुरुंगाच्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकली. त्यानंतर तुरूंगच्या प्रशासनाने त्यांच्या सुटकेची प्रक्रिया सुरु केली. त्यानंतर काही वेळाने देशमुखांची सुटका झाली.
मुंबईतील ऑर्थर रोडवरिल स्वागतास राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार, दिलीप वळसे- पाटील, जयंत पाटील, आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना आमदार जयंत पाटील म्हणाले, “नबाव मलिक आणि अनिल जेशमुख यांना खोट्या आरोपाखाली तुरूंगात डांबून राष्ट्रवादी कॉंग्रेसला जेरिस आणण्याचा प्रयत्न केला जातोय. अनिल देशमुखांच्या 13 महिन्यांची जबाबदारी कोणाची ? अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी अखंड महाराष्ट्र आणि राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित आहेत.” असे म्हटले आहे.
Previous Articleतेवढी हिंमत अजितदादांमध्ये नाहीच; बावनकुळेंचं प्रत्युत्तर
Next Article खानापुरा तालुक्याला पुरेशी बससेवा उपलब्ध करून देणे








