Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र कर्नाटक सीमा विवादाबाबत महाराष्ट्राने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी समिती स्थापन केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीत दोन्ही राज्यांनी समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला होता. दोन्ही राज्यात सलोखा राहावा यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेत आज समिती स्थापन केली आहे.
महाराष्ट्राच्या समितीत कायदा विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक,कोल्हापूर विशेष पोलीस महानिरीक्षक (आय जी),कोल्हापूर पोलिस अधीक्षक,सांगली पोलिस अधीक्षकांचा समावेश असणार आहे.सीमावर्ती भागातील वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांना,प्रवासी,व्यापारी,यांना त्रास होणार नाही याची काळजी ही समिती घेणार आहे.
Previous Articleपुण्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; 6 जणांना अटक
Next Article पंतप्रधान मोदींच्या आई हिराबेन यांची प्रकृती खालावली









