वृत्तसस्था/ मुंबई
येथे सुरू असलेल्या 2022 च्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात मंगळवारी खेळाच्या पहिल्या दिवशी मुंबईने सौराष्ट्रला पहिल्या डावात 289 धावावर रोखले. त्यानंतर मुंबईने पहिल्या डावात 2 बाद 36 धावा जमवल्या. सामन्यातील पहिल्या दिवशी गोलंदाजांनी एकूण 12 गडी बाद केले.
रणजी स्पर्धेच्या इलाईट ब गटातील या सामन्यात सौराष्ट्रच्या पहिल्या डावात कर्णधार वासवदाने 9 चौकारासह 75, जॅक्सनने 2 षटकार आणि 5 चौकारासह 47, मंकडने 4 चौकारासह 27, पार्थ भूतने 4 चौकारासह 25, डी. जडेजाने 3 चौकारासह 24, गोहिलने 1 षटकार आणि 2 चौकारासह 24 तसेच साकारियाने 2 षटकार आणि 1 चौकारासह 19 धावा जमवल्या. मुंबईतर्फे मुलानीने 4 तर तुषार देशपांडे अत्रादे यांनी प्रत्येकी 2 आणि अवस्थीने एक गडी बाद केला. मुंबईच्या पहिल्या डावात सलामीची जोड पृथ्वी शॉ आणि जैस्वाल हे बाद झाले. शॉने 4 तर जैस्वालने 2 धावा जमवल्या. सूर्यकुमार यादव 18 तर कर्णधार रहाणे 12 धावावर खेळत आहेत. सौराष्ट्रतर्फे साकारिया आणि जेनी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफकल ः सौराष्ट्र प. डाव 79.1 षटकात सर्वबाद 289, मुंबई प. डाव 8 षटकात 2 बाद 36.









